Wednesday, 13 July 2011

*** पावसाने...

***

हाका दिल्या मनाला लांबून पावसाने ,
नाचावयास नेले ओढून पावसाने..

बेधुंद आमराई, धुंदीत मोर नाचे

थैमान घातले मग नाचून पावसाने...

वाटेवरी तुझ्या मी माग घेत होते

ते टाकले ठसेही मोडून पावसाने....

मेघात कोरड्या मी अश्रू भरून नेले

अर्ध्यात चिंब केले गाठून पावसाने...

डोळ्यातल्या घनांची पर्वा कुणास होती !

एकेक स्वप्न नेले वाहून पावसाने...



...

Friday, 1 July 2011

*** शिदोरी आठवांची

***
तुझ्या डोळ्यात माझी आर्द्रता मी पाहिली,
दुराव्याने तुझ्या केली जिवाची काहिली...
कमाई संपली सारी,रिकामे हात हे 
शिदोरी आठवांची फक्त आता राहिली....

----- संपदा