***
हाका दिल्या मनाला लांबून पावसाने ,
नाचावयास नेले ओढून पावसाने..
बेधुंद आमराई, धुंदीत मोर नाचे
थैमान घातले मग नाचून पावसाने...
वाटेवरी तुझ्या मी माग घेत होते
ते टाकले ठसेही मोडून पावसाने....
मेघात कोरड्या मी अश्रू भरून नेले
अर्ध्यात चिंब केले गाठून पावसाने...
डोळ्यातल्या घनांची पर्वा कुणास होती !
एकेक स्वप्न नेले वाहून पावसाने...
...
काव्यसंपदा
Wednesday 13 July 2011
Friday 1 July 2011
*** शिदोरी आठवांची
***
तुझ्या डोळ्यात माझी आर्द्रता मी पाहिली,
दुराव्याने तुझ्या केली जिवाची काहिली...
कमाई संपली सारी,रिकामे हात हे
शिदोरी आठवांची फक्त आता राहिली....
----- संपदा
Wednesday 15 June 2011
*** भिजायचे हळूहळू...
***
पुन्हा लहान होउनी,झुलायचे हळूहळू
उनाडक्या करूनही रुसायचे हळूहळू
लबाड नेत्र पाझरो ,खरा झरा तुझा असे
तुझ्याच पावसामधे भिजायचे हळूहळू...
समोर वाट आंधळी, भरून दे प्रकाश तू
तुझ्याशिवाय चालणे जमायचे हळूहळू
तुझा सुवास घ्यायचा,तुलाच हात द्यायचा
लुटून गंध आतला ,रमायचे हळूहळू...
अथांग सागरामधे दिसेल मी तुला कसा !
तुझ्या विशाल लोचनी बुडायचे हळूहळू...
मिळेल दाट सावली,लपेन कुंतलात मी
तुझ्या मनास बावरे करायचे हळूहळू ...
हुशार बेरकी तुझा स्वभाव बोलघेवडा
मनातले अजूनही कळायचे हळूहळू ....
---- अरविंद
वृत्त---कलिंदनंदिनी
पुन्हा लहान होउनी,झुलायचे हळूहळू
उनाडक्या करूनही रुसायचे हळूहळू
लबाड नेत्र पाझरो ,खरा झरा तुझा असे
तुझ्याच पावसामधे भिजायचे हळूहळू...
समोर वाट आंधळी, भरून दे प्रकाश तू
तुझ्याशिवाय चालणे जमायचे हळूहळू
तुझा सुवास घ्यायचा,तुलाच हात द्यायचा
लुटून गंध आतला ,रमायचे हळूहळू...
अथांग सागरामधे दिसेल मी तुला कसा !
तुझ्या विशाल लोचनी बुडायचे हळूहळू...
मिळेल दाट सावली,लपेन कुंतलात मी
तुझ्या मनास बावरे करायचे हळूहळू ...
हुशार बेरकी तुझा स्वभाव बोलघेवडा
मनातले अजूनही कळायचे हळूहळू ....
---- अरविंद
वृत्त---कलिंदनंदिनी
Tuesday 14 June 2011
*** हळूहळू...
***
व्यवहार शाहण्यांचे कळले हळूहळू,
मी एकटीच वेडी ठरले हळूहळू...
सोडून तीर तू तर,झालास मोकळा
हे घाव काळजाचे भरले हळूहळू ....
काटा उरात माझ्या सलतो अजूनही
स्वप्नात मी फुलांच्या रमले हळूहळू....
दारासमोर माझ्या घोटाळले कुणी ,
प्रतिबिंब आरशाचे हलले हळूहळू....
कोठून त्या क्षणांची चाहूल लागली !
गाण्यात सूर माझ्या सजले हळूहळू...
------
गागालगा लगागा गागालगा लगा
व्यवहार शाहण्यांचे कळले हळूहळू,
मी एकटीच वेडी ठरले हळूहळू...
सोडून तीर तू तर,झालास मोकळा
हे घाव काळजाचे भरले हळूहळू ....
काटा उरात माझ्या सलतो अजूनही
स्वप्नात मी फुलांच्या रमले हळूहळू....
दारासमोर माझ्या घोटाळले कुणी ,
प्रतिबिंब आरशाचे हलले हळूहळू....
कोठून त्या क्षणांची चाहूल लागली !
गाण्यात सूर माझ्या सजले हळूहळू...
------
गागालगा लगागा गागालगा लगा
Tuesday 7 June 2011
*** अजून मी
***
साद घालतो अजून मी
स्पर्श जाणतो अजून मी
आरशात पाहिले तुला,
रूप लाटतो अजून मी
पारिजात अंगणी फुले,
गंध हुंगतो अजून मी
बोलतात लोचने तुझी,
मौन पाळतो अजून मी
काक कावतो छतावरी ,
वाट पाहतो अजून मी
साद घालतो अजून मी
स्पर्श जाणतो अजून मी
आरशात पाहिले तुला,
रूप लाटतो अजून मी
पारिजात अंगणी फुले,
गंध हुंगतो अजून मी
बोलतात लोचने तुझी,
मौन पाळतो अजून मी
काक कावतो छतावरी ,
वाट पाहतो अजून मी
मार्ग मोकळा असो जरी,
ठेचकाळतो अजून मी
आर्जवे खुणावती तुझी,
धाव धावतो अजून मी
---- अरविंद
कामिनी ---
गालगाल गालगाल गा
Saturday 4 June 2011
*** पळावे कशाला?
***
आठवांनी छळावे कशाला ?
पापण्यांनी गळावे कशाला ?
ऐकला दूर आलाप जेव्हा ,
दशदिशांनी चळावे कशाला ?
दीप हातात घेऊन आलो,
वादळाला कळावे कशाला ?
शोधती माग ते पावलांचे,
मी तया आढळावे कशाला ?
खूप दमलो घरी पोचतांना,
उंब-याने वळावे कशाला ?
पाट लाभो कुणा चंदनाचा,
मी कुणावर जळावे कशाला?
पाहुण्यासारखे दुःख आले,
मी सुखाने पळावे कशाला?
*
आठवांनी छळावे कशाला ?
पापण्यांनी गळावे कशाला ?
ऐकला दूर आलाप जेव्हा ,
दशदिशांनी चळावे कशाला ?
दीप हातात घेऊन आलो,
वादळाला कळावे कशाला ?
शोधती माग ते पावलांचे,
मी तया आढळावे कशाला ?
खूप दमलो घरी पोचतांना,
उंब-याने वळावे कशाला ?
पाट लाभो कुणा चंदनाचा,
मी कुणावर जळावे कशाला?
पाहुण्यासारखे दुःख आले,
मी सुखाने पळावे कशाला?
*
वृत्त--- भामिनी
गालगा गालगा गालगागा
Thursday 2 June 2011
*** नव्याने घडू कशाला ?
***
भल्याभल्यांच्या उनाडक्यांना नडू कशाला ?
पथात त्यांच्या बनून धोंडा पडू कशाला ?
फुलासभोती असून काटे प्रसन्न दिसती ,
उरात जखमा असो कितीही रडू कशाला ?
किती किती तीव्र घाव झाले उरात माझ्या !
समोर पाहून संकटांना दडू कशाला ?
अनोळखी वाटतो इथे मी मलाच आता ,
तरी दुजांना जगात मी सापडू कशाला ?
क्षणाक्षणाला झिजून गेल्या विटा घराच्या
अजून सोसायला नव्याने घडू कशाला ?
भल्याभल्यांच्या उनाडक्यांना नडू कशाला ?
पथात त्यांच्या बनून धोंडा पडू कशाला ?
फुलासभोती असून काटे प्रसन्न दिसती ,
उरात जखमा असो कितीही रडू कशाला ?
किती किती तीव्र घाव झाले उरात माझ्या !
समोर पाहून संकटांना दडू कशाला ?
अनोळखी वाटतो इथे मी मलाच आता ,
तरी दुजांना जगात मी सापडू कशाला ?
क्षणाक्षणाला झिजून गेल्या विटा घराच्या
अजून सोसायला नव्याने घडू कशाला ?
Subscribe to:
Posts (Atom)