Tuesday, 14 June 2011

*** हळूहळू...

***
व्यवहार शाहण्यांचे कळले हळूहळू,
मी एकटीच वेडी ठरले हळूहळू...

सोडून तीर तू तर,झालास मोकळा
हे घाव काळजाचे भरले हळूहळू ....

काटा उरात माझ्या सलतो अजूनही
स्वप्नात मी फुलांच्या रमले हळूहळू....

दारासमोर माझ्या घोटाळले कुणी ,
प्रतिबिंब आरशाचे हलले हळूहळू....

कोठून त्या क्षणांची चाहूल लागली !
गाण्यात सूर माझ्या सजले हळूहळू...

------
गागालगा लगागा गागालगा लगा

No comments:

Post a Comment