Wednesday 1 June 2011

*** भाळू कशाला ?

***
तुझ्या शब्दांवरी भाळू कशाला ?
जिवाला आपल्या जाळू कशाला ?

खरे बोलूनही खोटे ठरावे,
ख-याचा सोस सांभाळू कशाला ?

किती घायाळ केले आठवांनी !
उगा मी आसवे ढाळू कशाला ?

बघा,ऐकून या  घेतात भिंती 
अकारण मौन मी पाळू कशाला ?

फुलांनी छेडले रागात गाणे,
सुरांचा गोडवा टाळू कशाला ?

जगायाची निमित्ते शोधतांना,
दिशाना दीप ओवाळू कशाला ?

------ संपदा 

लगागागा लगागागा लगागा 

No comments:

Post a Comment