Tuesday 7 June 2011

*** अजून मी

***
साद घालतो अजून मी
स्पर्श जाणतो अजून मी

आरशात पाहिले तुला,
रूप लाटतो अजून
मी

पारिजात अंगणी फुले,
गंध हुंगतो अजून मी

बोलतात लोचने तुझी,
मौन पाळतो अजून
मी

काक कावतो छतावरी ,
वाट पाहतो अजून
मी

मार्ग
मोकळा असो जरी,
ठेचकाळतो अजून मी


आर्जवे खुणावती तुझी,
धाव धावतो अजून मी

---- अरविंद

कामिनी ---

गालगाल गालगाल गा

No comments:

Post a Comment