*
अंगार फार होता,काष्ठे जळून गेली...
ती पार कोळशाला हीरा करून गेली...
प्राणात छेडली माझ्या तार त्या सखीने,
गंधाळल्या सुरांनी परडी भरून गेली...
ती पाहताच मजला,आकाश शांत झाले
लहरी झुळूक माझ्या अंगावरून गेली...
गर्दीत आसवांच्या कांही मला दिसेना
माझ्यासवे सखीही पुरती भिजून गेली....
धुंदीत मोर नाचे,बेहोष रान झाले
निश्चेष्ट चेतनाही माझी झुलून गेली...
खोप्यापरी खगांच्या,आयुष्य टांगलेले
आधार तीच झाली,फांदी बनून गेली....
अंगार फार होता,काष्ठे जळून गेली...
ती पार कोळशाला हीरा करून गेली...
प्राणात छेडली माझ्या तार त्या सखीने,
गंधाळल्या सुरांनी परडी भरून गेली...
ती पाहताच मजला,आकाश शांत झाले
लहरी झुळूक माझ्या अंगावरून गेली...
गर्दीत आसवांच्या कांही मला दिसेना
माझ्यासवे सखीही पुरती भिजून गेली....
धुंदीत मोर नाचे,बेहोष रान झाले
निश्चेष्ट चेतनाही माझी झुलून गेली...
खोप्यापरी खगांच्या,आयुष्य टांगलेले
आधार तीच झाली,फांदी बनून गेली....
No comments:
Post a Comment