वृत्त:- मेनका
**
कोण जो नाही , सुखाचा सोबती ?
दुःख आहे आयुष्याचा सोबती.... [१]
गुंग सारे आपल्या सौख्यात हो,
हृदयी आनंद माझा सोबती... [२]
कोणताही सूर नाही लागला,
राग त्याच्या बासुरीचा सोबती... [३]
दुःख एकाकीपणाचे साहले,
आसवांचा थेंब होता सोबती... [४]
नाव माझी लाव तीरा ,नाविका
रे नियंता, तूच माझा सोबती... [५]
दूर सारे, राहिलो मी एकटा,
राम देही, 'राम' माझा सोबती... [६]
**
कोण जो नाही , सुखाचा सोबती ?
दुःख आहे आयुष्याचा सोबती.... [१]
गुंग सारे आपल्या सौख्यात हो,
हृदयी आनंद माझा सोबती... [२]
कोणताही सूर नाही लागला,
राग त्याच्या बासुरीचा सोबती... [३]
दुःख एकाकीपणाचे साहले,
आसवांचा थेंब होता सोबती... [४]
नाव माझी लाव तीरा ,नाविका
रे नियंता, तूच माझा सोबती... [५]
दूर सारे, राहिलो मी एकटा,
राम देही, 'राम' माझा सोबती... [६]
No comments:
Post a Comment