Friday 27 May 2011

*** हा देह चंदनी

***
हा देह चंदनी कां झाकाळतेस आता ?
कां मोगरा उशाशी तू माळतेस आता !

आणू इथे कशाला मी आरसा बिलोरी ?
डोळ्यांत तूच माझ्या न्याहाळतेस आता....

आधार वल्लरीला आता नवा मिळाला ,
वस्त्रात कां स्वतःला गुंडाळतेस आता !

छेडू उगा कशाला आता सतार येथे ?
होऊन सूर माझा घोटाळतेस आता....

पाडू नकोस येथे पाऊस तू फुलांचा ,
श्वासात तूच माझ्या गंधाळतेस आता....

आनंद खूप झाला,आतून पूर आला
ही व्यर्थ आसवे तू, कां ढाळतेस आता...

प्रत्यक्ष तू समोरी आहेस आज माझ्या,
पाने उगा स्मृतींची, कां चाळतेस आता ?

No comments:

Post a Comment