***
एकेक शब्द रात्री ती मंतरून गेली
डोळ्यास भावनांची भाषा कळून गेली
हातात हात आला,स्वर्गास बोट भिडले
हातावरील रेषा नियती पुसून गेली
होते ठसे उमटले,वाळूत पावलांचे
लाटेत सागराच्या, चिन्हे मिटून गेली
मी पूर्ण रात्र माझ्या अश्रूत चिंब केली
आली पहाट जेव्हां, तीही भिजून गेली
कोठून सावल्या या आल्या पुढ्यात माझ्या
त्या सावलीत मागे,इच्छा दडून गेली
शहरात शाहण्यांच्या हिंडून खूप झाले
शून्यात पावले तर आता शिरून गेली....
एकेक शब्द रात्री ती मंतरून गेली
डोळ्यास भावनांची भाषा कळून गेली
हातात हात आला,स्वर्गास बोट भिडले
हातावरील रेषा नियती पुसून गेली
होते ठसे उमटले,वाळूत पावलांचे
लाटेत सागराच्या, चिन्हे मिटून गेली
मी पूर्ण रात्र माझ्या अश्रूत चिंब केली
आली पहाट जेव्हां, तीही भिजून गेली
कोठून सावल्या या आल्या पुढ्यात माझ्या
त्या सावलीत मागे,इच्छा दडून गेली
शहरात शाहण्यांच्या हिंडून खूप झाले
शून्यात पावले तर आता शिरून गेली....
No comments:
Post a Comment