***
कोलाहलात येथे,गर्दीत एकटा मी
आतील शब्द राही ऐकीत एकटा मी...
माझ्या सभोवताली आहेत हो शहाणे
वेडा असा इथे या वस्तीत एकटा मी ...
आहेत सोबतीला दुःखे जरी सदा ही
राही तरी सुखाने मस्तीत एकटा मी...
ऐकावयास येता संगीत निर्झराचे,
त्याचाच ताल घेतो धुंदीत एकटा मी...
स्वत्वे विकून सौदा, नाही कधीच केला
गाठी नसून चाले ऐटीत एकटा मी...
सारे मला मिळाले ,काही न मागताही
शोधात मीच 'माझ्या' तंद्रीत एकटा मी...
कोलाहलात येथे,गर्दीत एकटा मी
आतील शब्द राही ऐकीत एकटा मी...
माझ्या सभोवताली आहेत हो शहाणे
वेडा असा इथे या वस्तीत एकटा मी ...
आहेत सोबतीला दुःखे जरी सदा ही
राही तरी सुखाने मस्तीत एकटा मी...
ऐकावयास येता संगीत निर्झराचे,
त्याचाच ताल घेतो धुंदीत एकटा मी...
स्वत्वे विकून सौदा, नाही कधीच केला
गाठी नसून चाले ऐटीत एकटा मी...
सारे मला मिळाले ,काही न मागताही
शोधात मीच 'माझ्या' तंद्रीत एकटा मी...
No comments:
Post a Comment