***
पाऊस हा अवेळी यावा जरा जरा
आनंद जीवनाचा घ्यावा जरा जरा
मस्तीत धावते हे मोकाट वासरू,
आवेग वादळाचा प्यावा जरा जरा
रूळावरी न आली गाडी अजून ही,
आकार जीवनाला द्यावा जरा जरा
आहे सभोवताली निःशब्द शांतता,
आवाज कांकणांचा व्हावा जरा जरा
गजरा कुणी सुखाचा,केसांत माळला ?
चोरून गंध त्याचा न्यावा जरा जरा
पाऊस हा अवेळी यावा जरा जरा
आनंद जीवनाचा घ्यावा जरा जरा
मस्तीत धावते हे मोकाट वासरू,
आवेग वादळाचा प्यावा जरा जरा
रूळावरी न आली गाडी अजून ही,
आकार जीवनाला द्यावा जरा जरा
आहे सभोवताली निःशब्द शांतता,
आवाज कांकणांचा व्हावा जरा जरा
गजरा कुणी सुखाचा,केसांत माळला ?
चोरून गंध त्याचा न्यावा जरा जरा
No comments:
Post a Comment