Friday 27 May 2011

*** तुझा


***
प्रसन्न वारा अजून बाकी
सुगंध सारा अजून बाकी

तुझीच स्वप्ने बघून उठले.
तरी शहारा अजून बाकी

निघून गेले तमाम तारे
पहाटतारा अजून बाकी

तमा नसू द्या कुणास माझी,
तुझा उबारा अजून बाकी

कुणीच माझी स्तुती केली,
तुझा पुकारा अजून बाकी

पळून जाईल दुःख माझे,
तुझा इशारा अजून बाकी

No comments:

Post a Comment