Friday 27 May 2011

*** जरा जरा ....

***
क्षणोक्षणी असे किती रडायचे जरा जरा !
फुलांकडे बघोनिया हसायचे जरा जरा .....

अम्हास वृक्ष सांगती-'भिऊ नका,उभे रहा'
जनास देत सावली, फुलायचे जरा जरा ....

अनंत घाव सोसले ,उन्हात पावसातले
भरून जाहले तरी जपायचे जरा जरा...

असेच रोज रोज कां मरायचे पुन्हा पुन्हा !
नवीन श्वास घेउनी जगायचे जरा जरा.....

अजाण बालकापरी हसायचे रडायचे ,
हळूच माउलीकडे पळायचे जरा जरा ....

करून कर्म चांगले,मिळेल श्रेय शेवटी
गरीब लोक आपुले करायचे जरा जरा...

No comments:

Post a Comment