***
धुंद गाणे गोठणे नाही खरे
शब्द आता खुंटणे नाही खरे
जीवनाचे ध्येय आहे चालणे
पावलांचे थांबणे नाही खरे
दूर रानातून आले पाखरू
डाहळीचे मोडणे नाही खरे
पाहिली जादू तुझ्या स्पर्शातली
बाग़ ही कोमेजणे नाही खरे
मी व्यथा प्राणातली सांगू कशी ?
हुंदक्यांचे दाटणे नाही खरे
रास चाले अंबरी चंद्रासवे,
तारकांना मोजणे नाही खरे.....
No comments:
Post a Comment