***
लाटण्याने मारतांना खूप होती हाल माझे
लोचनी अंगार दाटे ,अंग लालीलाल माझे
लाटण्याने मारतांना भूत संचारून येते ,
जीव त्याचा घाबरा अन् गाल होती लाल माझे
लाटण्याने मारतांना सर्वथा पाणीच पाणी
धांदलीने माठ फुटतो ,कर्म हे कंगाल माझे
लाटण्याने मारतांना फक्त एक ध्यास असतो,
एकदा त्याने म्हणावे - 'वागणे बेताल माझे'
उतरता पारा मनाचा ,शांतता छळते जिवाला
वाटते गालावरी मी, टेकवावे गाल माझे
लोचनी अंगार दाटे ,अंग लालीलाल माझे
लाटण्याने मारतांना भूत संचारून येते ,
जीव त्याचा घाबरा अन् गाल होती लाल माझे
लाटण्याने मारतांना सर्वथा पाणीच पाणी
धांदलीने माठ फुटतो ,कर्म हे कंगाल माझे
लाटण्याने मारतांना फक्त एक ध्यास असतो,
एकदा त्याने म्हणावे - 'वागणे बेताल माझे'
उतरता पारा मनाचा ,शांतता छळते जिवाला
वाटते गालावरी मी, टेकवावे गाल माझे
No comments:
Post a Comment