***
मिठीत धुंद होउनी झुलून जा,बुडून जा
तुझीच संपदा असे,तुलाच तू लुटून जा
मला नकोस आवरू,तुला नकोस सावरू
सुसाट वादळापरी लगेच बावरून जा
भिजून चिंब जाहले,तहान भागली कुठे ?
उरात कैफ माझिया हळूहळू भरून जा
पुरूनही उरे असा , फुलात गंध साठला
भरून घे पुन्हा पुन्हा,सुवास साठवून जा
लयीत छेडलेस तू,सुरेल गीत साजरे
असेच सूर छेडुनी मनास चाचपून जा
तुझीच संपदा असे,तुलाच तू लुटून जा
मला नकोस आवरू,तुला नकोस सावरू
सुसाट वादळापरी लगेच बावरून जा
भिजून चिंब जाहले,तहान भागली कुठे ?
उरात कैफ माझिया हळूहळू भरून जा
पुरूनही उरे असा , फुलात गंध साठला
भरून घे पुन्हा पुन्हा,सुवास साठवून जा
लयीत छेडलेस तू,सुरेल गीत साजरे
असेच सूर छेडुनी मनास चाचपून जा
No comments:
Post a Comment