***
जाणून केलेल्या चुकांचा ठोकताळा मांडला,
नाही मिळाली उत्तरे,मग प्रश्न माझा भांडला ...
भारावलेल्या सावल्या ,भासापरी मज भासल्या
मी धावता त्यांच्याकडे, आभास गेला खांडला...
होकार देतांना तया , झाले जरा थोडे पुढे
आले घरी माझ्या नव्या, मी उंबरा ओलांडला ...
आले तुझे बोलावणे ,झाले जिवाचे चांदणे
तंद्रीत माझा कापरा हा देह मी झोकांडला ...
गंधाळले गाणे मनी, झंकारल्या दाही दिशा
सोडून सारी बंधने, शृंगार माझा सांडला ....

No comments:
Post a Comment