Friday 27 May 2011

*** तूच माझा नाखवा


***


जेव्हां मनाची साद येते,जोड़ते नाते तिथे
तेव्हांच लवलवते,जिवाचे बावरे पाते तिथे

मी साद जेव्हा घालते,प्रतिसाद देते कोकिळा
गीतात माझे बोल ती, फांदीवरी गाते तिथे

एकाच हाकेने तुझ्या,झंकारती तारा मनी
लाजून माझी रागिणी लाडावली जाते तिथे


आभाळ जेव्हा दाटते, डोळ्यांत काजळ साठते
रंगात काळ्या पापणी,माझ्याविना न्हाते तिथे

माझा खरा विश्वास तू अन् तूच माझा नाखवा
मी हेलकावे सागरी, नाही दुजे त्राते तिथे .....

No comments:

Post a Comment