***
जोडून ठेवलेले, सोडून टाकले मी
आयुष्य आज माझे मोडीत काढले मी
जल्लोष भावनांचा हा रोज रोज चाले,
मोहातल्या क्षणांना बाजूस सारले मी
आवेग वादळांचा,झाली भयाण शीडे
ना लागला किनारा,अर्ध्यात गावले मी
औदार्य वास्तवाचे, नाही मला उमगले
स्वप्नांस पांगळ्या कां आजन्म पोसले मी !
डोळे पुसून परके, आनंद आपल्याला
तात्पर्य जीवनाचे आताच जाणले मी ...
आयुष्य आज माझे मोडीत काढले मी
जल्लोष भावनांचा हा रोज रोज चाले,
मोहातल्या क्षणांना बाजूस सारले मी
आवेग वादळांचा,झाली भयाण शीडे
ना लागला किनारा,अर्ध्यात गावले मी
औदार्य वास्तवाचे, नाही मला उमगले
स्वप्नांस पांगळ्या कां आजन्म पोसले मी !
डोळे पुसून परके, आनंद आपल्याला
तात्पर्य जीवनाचे आताच जाणले मी ...
No comments:
Post a Comment