***
प्रत्येक पावलाला,नाती जडून गेली
गेल्यावरी पुढे ती मागे वळून गेली..।
आता कुठे दिसेना डोळ्यांस सांजवेळी
स्वप्नात रोज माझ्या ती वावरून गेली...
छाया विवंचनांची दाटून खूप आली ,
गोंजारता सुखांनी ,दुःखे विरून गेली...
काटा उरात सलता, डोळे भरून आले
पाहून चेहरा ती छद्मी हसून गेली....
जाळून भावनांना केला प्रकाश तेव्हां,
आश्वासने दिव्यांची जेव्हां विझून गेली...
आली दया तयेला, लावण्यस्पर्श झाला
ती पार कोळशाला हीरा करून गेली....
गेल्यावरी पुढे ती मागे वळून गेली..।
आता कुठे दिसेना डोळ्यांस सांजवेळी
स्वप्नात रोज माझ्या ती वावरून गेली...
छाया विवंचनांची दाटून खूप आली ,
गोंजारता सुखांनी ,दुःखे विरून गेली...
काटा उरात सलता, डोळे भरून आले
पाहून चेहरा ती छद्मी हसून गेली....
जाळून भावनांना केला प्रकाश तेव्हां,
आश्वासने दिव्यांची जेव्हां विझून गेली...
आली दया तयेला, लावण्यस्पर्श झाला
ती पार कोळशाला हीरा करून गेली....
No comments:
Post a Comment