***
हार होवो जीत वा , लढणार मी
घेतली नाही कधी माघार मी....
कां जगावे ,व्यर्थ शेळीसारखे ?
चंडिकेची तळपती तलवार मी ...
काफिला सोडून जाऊ दे मला,
जिद्द आहे एकटी जगणार मी...
मेणबत्ती एक मिणमिणता दिवा,
तेवत्या डोळ्यातला अंगार मी...
थेंब नाही, कोरडी झाली धरा,
पाहवेना,छेडला मल्हार मी....
दुर्बलांचा कोण वाली या जगी ?
'अस्मिता ' खंबीर ही, झुंजार मी...
घेतली नाही कधी माघार मी....
कां जगावे ,व्यर्थ शेळीसारखे ?
चंडिकेची तळपती तलवार मी ...
काफिला सोडून जाऊ दे मला,
जिद्द आहे एकटी जगणार मी...
मेणबत्ती एक मिणमिणता दिवा,
तेवत्या डोळ्यातला अंगार मी...
थेंब नाही, कोरडी झाली धरा,
पाहवेना,छेडला मल्हार मी....
दुर्बलांचा कोण वाली या जगी ?
'अस्मिता ' खंबीर ही, झुंजार मी...
No comments:
Post a Comment