***
आनंद आज माझ्या हृदयात साठवू देएकेक सूर आता गंधात मोहरू दे ....
ही सांज धुंद व्हावी ओलावल्या सुरांनी ,
आतून कोवळासा गंधार पाझरू दे ...
आल्या उधाणलाटा परि कोरडा किनारा
मोहातल्या क्षणांचा पाऊस कोसळू दे...
कोंडून श्वास माझे,आले गळ्यात गाणे
हळुवार हुंदक्यांचा,आवेग आवरू दे...
हातात हात आले,श्वासात श्वास डोले
तालासुरात आता मनसोक्त हुंदडू दे ...
माझी दिशा निराळी अन् वेगळाच रस्ता,
स्वप्नातल्या फुलांच्या बागेत वावरू दे...
No comments:
Post a Comment