***
असेना दुरावा,तुझा दोष नाही
मनी राहशी तू ,तुझा भास नाही...
झुरे शब्द ओठी,तया ओल आली
परंतू टिपाया तुझा ओठ नाही...
मला कैद केले जरी तू मिठीने
तरीही हवासा तसा कैफ़ नाही ...
असा बांध फोडून जाऊ कशी मी ?
मुक्या हुंदक्यांना अता जोर नाही...
नका नाव ठेवू , उगा दर्पणाला
व्यथा दावितो तो ,मनी खोट नाही...
रदीफ़ाकड़े शोधला काफ़िया मी ,
तरी शेर व्हावा तसा ख़ास नाही...
मनी राहशी तू ,तुझा भास नाही...
झुरे शब्द ओठी,तया ओल आली
परंतू टिपाया तुझा ओठ नाही...
मला कैद केले जरी तू मिठीने
तरीही हवासा तसा कैफ़ नाही ...
असा बांध फोडून जाऊ कशी मी ?
मुक्या हुंदक्यांना अता जोर नाही...
नका नाव ठेवू , उगा दर्पणाला
व्यथा दावितो तो ,मनी खोट नाही...
रदीफ़ाकड़े शोधला काफ़िया मी ,
तरी शेर व्हावा तसा ख़ास नाही...
No comments:
Post a Comment