***
सारखा हा खाजतो तळहात आता
फ़ायदा होईल की कामात आता
कावळा केकावला आहे सकाळी
पाहुणे येतील हो दारात आता
नेत्र डावा सारखा कां उडत आहे ?
साजणा येईल गाणे गात आता
आडवी मार्जार रस्त्यातून गेली,
वाटते होणार कांही घात आता
दैववादी माणसांच्या अंधश्रद्धा
भाबडा विश्वास करतो मात आता
मांत्रिकाला ,दांभिकाला भाव आला
मूल्य त्यांच्या वाटते मंत्रात आता
फ़ायदा होईल की कामात आता
कावळा केकावला आहे सकाळी
पाहुणे येतील हो दारात आता
नेत्र डावा सारखा कां उडत आहे ?
साजणा येईल गाणे गात आता
आडवी मार्जार रस्त्यातून गेली,
वाटते होणार कांही घात आता
दैववादी माणसांच्या अंधश्रद्धा
भाबडा विश्वास करतो मात आता
मांत्रिकाला ,दांभिकाला भाव आला
मूल्य त्यांच्या वाटते मंत्रात आता
No comments:
Post a Comment