Friday, 27 May 2011

*** सांजवेळी


***

एकटे आयुष्य माझ्या सोबतीला सांजवेळी
मोकळे आकाश झाले,सूर्य जाता सांजवेळी

रांग पक्षांच्या थव्याची,छान रांगोळी दिसावी
एकले हरखून जावे, पाहतांना सांजवेळी

धूळ रानातून आली, अंबरी लाली उधळली
वासरांच्या घुंगरांचा नाद झाला सांजवेळी

गीत प्रीतीचे सख्याच्या आठवांनी गुणगुणावे
निर्झराने खळखळावे, साथ द्याया सांज वेळी...

एकटीने मी जळावे, कां दिव्याने काजळावे ?
थेंब माझ्या आसवांचा,तेल व्हावा सांजवेळी...

No comments:

Post a Comment