Friday 27 May 2011

*** हात हातात माझ्या


***

पाहिली स्वप्ने तुझी डोळ्यात माझ्या
फक्त दे तू हात या हातात माझ्या

पूर येवो,कोसळो पाणी कितीही
ओढ़ आहे,जोम ही पायात माझ्या

पापण्या ओल्या कळ्यांच्या कां सकाळी ?
रात्र जागी राहिली स्वप्नात माझ्या

तू दिसेना, थांबला झाडात वारा
हुंदका दबला जणू वक्षात माझ्या

कोंडले ओठांत मी सारे उमाळे
धार नाही आज आवाजात माझ्या

आतले गाणे तुझ्यासाठीच आहे
तूच गा रे येवुनी कंठात माझ्या

No comments:

Post a Comment